पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले आहेत उपनिषदातील संस्कृत श्‍लोक !

  • पाश्‍चात्य देशातील विश्‍वविद्यालयाला उपनिषदांचे महत्त्व लक्षात येते; मात्र भारतातील तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना ते लक्षात येत नाही, हे लज्जास्पद ! – संपादक
  • भारतातील किती विश्‍वविद्यालयांच्या भिंतींवर अशा प्रकारे उपनिषदांमधील श्‍लोक लिहिले गेले आहेत ? – संपादक
पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आलेले उपनिषदातील संस्कृत श्‍लोक

नवी देहली – सामाजिक माध्यमांतून एक छायाचित्र प्रसारित होत आहे. यामध्ये पोलंडच्या वॉर्सा विश्‍वविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या बाहेरील भिंतीवर उपनिषदामधील संस्कृत भाषेतील श्‍लोक लिहिण्यात आल्याचे दिसत आहे. पोलंडमधील भारतीय दूतावासाने ट्वीट करून याची माहिती देतांना लिहिले आहे, ‘किती सुंदर दृश्य आहे. उपनिषद हिंदु धर्माचा आधार असणार्‍या वैदिक संस्कृतचे मूळ आहे.’

सामाजिक माध्यमांतून यावर अनेकांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. एकाने म्हटले  की, जेव्हा जगभरात हिंदु धर्माचा स्वीकार करण्यात येत आहे, त्या वेळी आम्ही मात्र  पाश्‍चात्त्य संस्कृतीकडे आकर्षित होत आहोत.