पोर्तुगालमध्ये गर्भवती भारतीय महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू

आरोग्यमंत्र्यांना द्यावे लागले त्यागपत्र !

पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो

लिस्बन (पोर्तुगाल) – पोर्तुगालमध्ये एका भारतीय महिलेल्या मृत्यूनंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे. लिस्बन येथे हृदयविकाराचा झटका आलेल्या ३४ वर्षीय भारतीय महिलेचा रुग्णालयात जागा उपलब्ध नसल्याने दुसर्‍या रुग्णालयात नेत असतांना मृत्यू झाला. आपत्कालीन सेवा बंद केली असल्याने, तसेच रुग्णालयांमधील डॉक्टरांचा तुटवडा आणि गर्भवती महिलांना योग्य सेवा मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून आरोग्यमंत्र्यांवर टीका केली जात होती. अशा वेळी या महिलेचा मृत्यू झाल्याने त्यांना त्यागपत्र द्यावे लागले.

भारतीय गर्भवती महिला पोर्तुगालमध्ये फिरण्यासाठी आली होती. महिला प्रसूतीसाठी पोर्तुगालमधील सर्वांत मोठ्या रुग्णालयात आली होती; मात्र या रुग्णालयातील प्रसूती कक्षात तिला जागा मिळाली नाही. यामुळे तिला दुसर्‍या रुग्णालयात जाण्यात सांगण्यात आले. महिलेला दुसर्‍या रुग्णालयात नेत असतांना तिला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर या महिलेचा मृत्यू झाला. महिलेने बाळाला जन्म दिला आहे.