इटलीत कट्टर उजव्या विचारसरणीचे सरकार येण्याची चिन्हे !

इटलीचा राष्ट्रध्वज

रोम (इटली) – इटलीमध्ये पुढील मासात निवडणुका होत असून तेथील ‘ब्रदर्स ऑफ इटली’ नावाचा राजकीय पक्ष सध्या आघाडीवर आहे. हा पक्ष कट्टर उजव्या विचारसरणीचा असून त्याच्या प्रमुख ज्यॉर्जिया मेलोनी या इटलीच्या प्रथम महिला पंतप्रधान बनण्याची चिन्हे आहेत.

बेनेट मुसोलिनी याच्यानंतर प्रथमच इटलीमध्ये प्रखर राष्ट्रवादाचे वारे घोंघावू लागले आहेत. ‘हंगेरीचे पंतप्रधान विक्तर ओर्बान आणि फ्रान्स येथील प्रमुख राजकारणी मरीन ली पेन यांच्यासारखीच मेलोनी यांची विचारसरणी असून ती युरोपला घातक आहे’, असे काही जणांचे म्हणणे आहे. ‘युरोपातील उजव्या विचारसरणीचे राजकारणी हे मुसलमान शरणार्थींच्या विरोधात असून ते रशियाला पाठिंबा देऊ शकतात’, असे म्हटले जाते.