ग्रीक महिलेची तिच्या पाकिस्तानी पतीने केली हत्या !

आता युरोपीय देश ग्रीसमध्येही ‘लव्ह जिहाद’ !

एथेंस (ग्रीस) – हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या षड्यंत्रासारखा प्रकार आता युरोपीय देश ग्रीसमध्येही समोर आला आहे. ग्रीसच्या लारिसा शहरात रहाणार्‍या एका ख्रिस्ती महिलेचा मृतदेह येथील एका इमारतीच्या तळघरात आढळून आला. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात ती तिच्या पाकिस्तानी पतीसमवेत त्या इमारतीत रहात होती. पतीनेच तिची हत्या करून तो पाकिस्तानला पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ३५ वर्षांची होती. ९ सप्टेंबर या दिवशी तिचा मृतदेह शहरातील ‘पापनास्तासियो स्ट्रीट’वर असणार्‍या एका इमारतीच्या तळघरातून हस्तगत करण्यात आला. तिचा मृतदेह पुष्कळ सडला होता आणि त्यातून येणार्‍या दुर्गंधीमुळे स्थानिकांना याविषयी समजले. महिलेने काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीच्या विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार प्रविष्ट केली होती.

काही दिवसांपूर्वीच ग्रीसची राजधानी एथेंसजवळ असलेल्या पेरिस्टारी या शहरातही लव्ह जिहादचे असेच एक प्रकरण समोर आले होते. यामध्ये अहसान नावाच्या पाकिस्तानी प्रियकराने त्याच्या १७ वर्षीय प्रेयसीची हत्या केली होती.