हाफिज सईद याला दुसर्‍या देशात पाठवा ! – चीनचा पाकिस्तानला सल्ला

मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार असणारा हाफिज सईद याला पाकमध्ये अधिक काळ न ठेवता तात्काळ पश्‍चिम आशियातील देशांमध्ये हालवण्याचा सल्ला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना दिला आहे.

(म्हणे) ‘अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण इस्रायलला उद्ध्वस्त करू !’

जर इस्रायलने पाकिस्तानवर आक्रमण केले, तर ज्यूंच्या इस्रायलला १२ मिनिटांत उद्ध्वस्त करू, अशी चेतावणी पाकिस्तानी सैन्याचे कमांडर हयात यांनी दिली आहे. (उसने अवसान आणणे म्हणजे काय, ते यातून लक्षात येते ! – संपादक)

पाकच्या पंजाब प्रांताच्या सरकारकडून कृष्ण मंदिरासाठी २ कोटी रुपये

पाकच्या पंजाब प्रांताच्या सरकारने रावळपिंडी येथील कृष्ण मंदिराचे सौंदर्यीकरण आणि त्याच्या परिसराच्या विस्तारासाठी २ कोटी रुपये देण्याचे घोषित केले आहे…..

शरीफ यांचे वक्तव्य प्रसिद्ध केल्याने पाकमधील ‘डॉन’ वृत्तपत्राचे वितरण रोखले

पाकचे माजी पंतप्रधान अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी ‘मुंबईवर वर्ष २००८ मध्ये पाकिस्तानातील आतंकवाद्यांनीच आक्रमण केले’, असे वक्तव्य नुकतेच केले होते. ते वृत्त प्रसिद्ध केल्याने येथील ‘डॉन’ या इंग्रजी वृत्तपत्राचे वितरण रोखल्याचा आरोप ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या संस्थेने केला आहे.

पाकिस्तानात मुंबईवरील आक्रमणाचा खटला चालू

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ‘मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणात पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचा हात असल्याची’ स्वीकृती दिल्यानंतर आता पाकमध्ये या आक्रमणावरील खटला पुन्हा चालू झाला आहे.

पाकमध्ये हिंदु व्यापारी पिता-पुत्राची गोळ्या घालून हत्या

येथील हब जिल्ह्याच्या गडानी परिसरात व्यापारी जयपाल दास आणि त्यांचा मुलगा हरेश यांच्यावर काही गुंडांनी आक्रमण करून त्यांच्याकडील पैसे लुटण्याचा प्रयत्न केला.

आत्मघाती आक्रमणे इस्लामविरोधी !

आत्मघाती आक्रमणे आणि आतंकवाद इस्लामच्या सिद्धातांच्या विरोधात आहे, असे मुसलमान धर्मगुरूंनी (उलेमांनी) म्हटले आहे, असे वृत्त पाकिस्तानमधील ‘डॉन’ या दैनिकाने पहिल्या पानावर प्रसिद्ध केले आहे.

(म्हणे) ‘भारतात मुसलमान आणि पाकिस्तान यांच्याविषयी असहिष्णुता वाढली !’ – पाकिस्तान

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातील महंमद अली जिना यांच्या छायाचित्रावरून चालू असलेला वाद भारतात मुसलमान आणि पाकिस्तान यांच्याविषयी किती असहिष्णू……

नवाज शरीफ यांनी भारतात अब्जावधी रुपये जमा केल्याचे पाकमधील प्रसारमाध्यमांचे वृत्त

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतात अब्जावधी रुपये जमा केल्याचे वृत्त पाकमधील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. शरीफ आणि पाकमधील इतर मोठ्या लोकांनी अवैधरित्या ४.९ अब्ज डॉलर्स भारतात गुंतवले आहेत

(म्हणे) ‘सावरकरांनीच धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली !’

विनायक दामोदर सावरकर यांनी वर्ष १९२३ मध्ये ‘हिंदुत्व’ या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला. या शब्दाचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथात नव्हता. त्यांनीच धर्माच्या आधारे देशाचे विभाजन केले.


Multi Language |Offline reading | PDF