इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानात चिनी अधिकार्यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांनंतर खैबर पख्तुनख्वामधील ३ प्रकल्पांवर काम करणार्या चीनच्या आस्थापनांनी काम थांबवले आहे. याखेरीज चीन त्याच्या अनुमाने १ सहस्र ५०० नागरिकांना तेथून बाहेर काढत आहे. हे तीनही प्रकल्प ९ सहस्र ८६० मेगावॅट वीजनिर्मिती करणारे आहेत. पाकच्या शांगला जिल्ह्यात ३ दिवसांपूर्वी चिनी अभियंत्यांच्या बसवर झालेल्या आत्मघाती आक्रमणात चीनचे ५ अभियंते ठार झाले होते. मृत्यूच्या छायेखाली काम करता येत नसल्याचे अनेक कर्मचार्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितले. यानंतर चीनने वरील निर्णय घेतला.
संपादकीय भूमिकापाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल ! |