कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या डेरा मुराद जमाली शहरात काही दिवसांपूर्वी हिंदु मुलगी प्रिया कुमारी हिचे सुक्कूर येथून अपहरण करण्यात आले होते; मात्र तिच्याविषयी अद्याप कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. या प्रकरणी हिंदूंनी तीव्र संताप व्यक्त केला असून त्यांनी मोर्चे काढून निदर्शने केली.
१. डेरा मुराद जमाली येथील हिंदूंनी अपहरणाचा निषेध करत हिंसक आंदोलन केले. ‘डॉन’ दैनिकाने वृत्त दिले आहे की, कुमारीला शोधण्यात आणि तिची सुटका करण्यात अपयश आल्याने आंदोलकांनी निराशा व्यक्त केली. मुखी मानक लाल आणि सेठ तारा चंद यांच्या नेतृत्वाखाली हिंदु समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मोर्चा काढला. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.
२. हिंदूंनी या प्रकरणी देशव्यापी आंदोलनाची चेतावणी दिली आहे. ‘ह्युमन राइट्स फोकस पाकिस्तान’ या संघटनेने देशातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक छळाचा तीव्र निषेध केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जनतेने मोठ्या आंदोलनाची सिद्धता केली आहे. या संघटनेने सांगितले की, ख्रिस्ती, हिंदु, अहमदिया, शीख आणि इतर धर्मांतील अनेक लोक गेल्या काही महिन्यांत विविध आक्रमणांना बळी पडले आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंनी अशी कितीही निदर्शने केली, तर त्याचा परिणाम ना तेथील सरकारवर होणार ना धर्मांध मुसलमानांवर ! पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय आहे ! |