सध्याच्या शिक्षणात नैतिकमूल्यांचे शिक्षण देण्याची आवश्यकता ! – श्री श्री १००८ श्री रामदयाल दास महाराज

हरिद्वार, १६ एप्रिल (वार्ता.) – पूर्वीच्या काळात सनातन संस्कृतीमध्ये वडील-मुलगा यांच्यामध्ये जे संबंध होते, ते आताच्या कलियुगात राहिलेले नाहीत. आजची मुले इंग्रजी शाळेत जात असल्याने त्यांना पालकांच्या विषयी स्वतःचे कर्तव्य काय आहे, हेही कळत नाही. पुढे हीच मुले आई-वडिलांना आश्रमात सोडून परदेशात निघून जातात. सध्या मुलांचे शिक्षण केवळ पैसे कमावण्यापुरते मर्यादित राहिले असून या शिक्षणात … Read more

गल्लीत ११ रुग्ण आढळल्याने परिसरात प्रवेश बंदी !

एका गल्लीत कोरोनाचे ११ रुग्ण आढळल्याने तेथे १४ दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सोयीसुविधा पोचवण्यात येणार आहेत.

नागपूर येथे ‘सी.एस्.आर्.’ निधीतून व्हेन्टिलेटर उपलब्ध होणार !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ‘व्हेन्टिलेटर’ यंत्रणेचे प्रात्यक्षिक

सांगली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत १०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

गेल्या काही दिवसांत सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत १०६ जणांचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाला आहे, तर ७ सहस्र ८१२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

हरिद्वार येथे वादळीवार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात हानी

कुंभक्षेत्रातील संत आणि भक्त यांच्या निवासस्थानाचीही हानी झाली आहे.

राज्यातील व्यापारी कायदेशीर पर्यायांचा अभ्यास करून दोन दिवसांत महाराष्ट्र चेंबर त्यांचा निर्णय घोषित करणार ! – ललित गांधी, महाराष्ट्र चेंबर

‘‘राज्य सरकारचा हा आदेश सर्वांना समान न्याय देणारा नसून मूळ कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी योग्य नाही.’ – महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. अतुल शहा

आतंकवाद रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – केरळचे आमदार पी.सी. जॉर्ज

जॉर्ज हे केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष)चे आमदार आहेत. ते काही हिंदू नाहीत. असे असूनही त्यांना ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावा’, असे वाटते, यावरून धर्मनिरपेक्षवाल्यांनी विचार करणे आवश्यक !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे सरकारी आदेश असतांनाही खासगी लॅबकडून कोरोनाच्या चाचण्या बंद !

चाचण्याच करण्यात आल्या नाहीत, तर रुग्ण सापडणार कसे ? रुग्ण सापडले नाहीत, तर उपचार कसे होणार ? आणि उपचार झाले नाहीत, तर व्यक्ती दगावणार, हे पहाता सरकारने कठोर उपययोजना करणे आवश्यक !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वटवृक्ष मंदिरात स्वामींचा प्रकटदिन साधेपणाने साजरा !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ‘देऊळ बंद’ ठेवल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती होती.