बुलढाणा येथे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वाहन जाळण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे चारचाकी वाहन जाळण्याचा प्रयत्न २ अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला. २६ मे या दिवशी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे चारचाकी वाहन जाळण्याचा प्रयत्न २ अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला. २६ मे या दिवशी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
राज्य आर्थिक संकटात असतांना वैयक्तिक गोष्टींवर सर्वसामान्यांच्या करातून आलेल्या पैशांची उधळपट्टी करणे अपेक्षित नाही. सरकारी तिजोरीत अशा प्रकारे कुठेकुठे अनावश्यक व्यय होत आहे का ? याचा अभ्यास करून सरकारने हा व्यय थांबवावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे !
गुप्तचर शाखेचा अधिकारी सत्यम बहल याला त्याच्या पत्नीने सापळा रचून अन्य महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यावरून रंगेहाथ पकडले. यामुळे पत्नीने पोलीस उपमहानिरीक्षकांकडे पतीवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
कोरोनाचे संकट तीव्र असल्याने कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येते. तरीही त्यांचे उल्लंघन करणे, हे गंभीर आहे !
शौर्यजागृती व्याख्यानाच्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा चिंचवड येथील धर्मप्रेमींचा निर्धार !
महापालिकेकडून प्रति मास १ लाख ५० सहस्र रुपयांचे वेतन घेत असतांनाही डॉ. मोहोकर या स्वत:चे खासगी रुग्णालय चालवत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या.
कोणत्याही स्थितीत स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण स्वतःच सिद्ध व्हायला हवे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले.
मार्च ते मे या कालावधीत नियम मोडणार्यांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत ३ कोटी १० लाख १ सहस्र ९०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
कोरोनाकाळात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. गीता वाचन हा मन:शांतीसाठी सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे गीता ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हरिदत्त जाधव यांनी केले.
सध्या पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विचार करून योग्य दर निश्चित करावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.