

मिरज, २६ मे (वार्ता.) – ‘श्री सेवा सप्ताह अंतर्गत’ रुग्णसेवा प्रकल्प मिरज यांच्याकडून समर्थ रामदास स्वामी स्थापित श्री संत वेणाबाई मठ गोशाळेत चारा वाटप करण्यात आले. या वेळी श्री. महादेव जोगळेकर यांच्या हस्ते मठाधीश पू. कौस्तुभ महाराज यांना एक सहस्र रुपयांची देणगी देण्यात आली. या प्रसंगी श्री. भालचंद्र आठवले आणि श्री. अभिजीत फणसाळकर यांनीही उत्स्फूर्तपणे देणगी दिली. या उपक्रमासाठी ‘महा एन्.जी.ओ. फेडरेशन पुणे’ आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांचे सहकार्य लाभले. या वेळी डॉ. भालचंद्र साठ्ये, सर्वश्री श्रेयस गाडगीळ, अमित पटवर्धन, प्रसन्न चिप्पलकट्टी, मल्लिकार्जुन खिचडे, अधिवक्ता अजिंक्य कुलकर्णी, अधिवक्ता माधव ताम्हणकर यांसह अन्य उपस्थित होते.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !