राज्यसभेच्या एका जागेसाठी गोव्यात २४ जुलैला निवडणूक

राज्यसभा

पणजी, ६ जुलै (वार्ता.) – गोव्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी २४ जुलै या दिवशी निवडणूक होणार आहे. गोवा विधिमंडळ सचिवालयाने या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. यासंबंधीची अधिसूचना निर्वाचन अधिकारी नम्रता उल्मन यांनी प्रसिद्ध केली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिनांक १३ जुलै असून अर्जांची छाननी १४ जुलै या दिवशी होणार आहे आणि अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १७ जुलै आहे. २४ जुलै या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निवडणूक होणार आहे. ही निवडणूक गोवा विधानसभा संकुलाच्या अतीमहनीय व्यक्तींच्या ब्लॉकमध्ये होणार आहे. राज्यसभेचे विद्ममान खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत २८ जुलै या दिवशी संपत आहे.

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे नाव निश्चित झाले आहे, तर घोषणेची औपचारिकता केवळ बाकी आहे. विरोधी काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांनी ही निवडणूक गंभीरपणे घेतलेली नसल्याचे दिसत आहे.