बांधकाम व्यावसायिक डी.एस्. कुलकर्णी यांच्यावर सीबीआयकडून २ गुन्हे नोंद !

येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डी.एस्.के.) यांच्या विरोधात सीबीआयने दोन गुन्हे नोंद केले आहेत. त्यांच्यावर ५८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. १ जुलै २०२० या दिवशी स्टेट बँकेने दिलेल्या पत्राच्या आधारे पहिला गुन्हा नोंद केला आहे.

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंडळाचे मार्गदर्शक सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांचे अपघाती निधन

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत प्रमुख डॉ. सुरेशराव चिकटे यांनी सांगितले, ‘‘ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांनी कथा, प्रवचन या माध्यमांतून हिंदूसंघटनासाठी कार्य करून संपूर्ण आयुष्य हिंदु धर्मरक्षणासाठी वेचले. धर्मातील अशी विभूती जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.’’

नियम मोडून गैरवर्तन करणाऱ्या २ धर्मांधांना अटक !

येथील बैलबाजार परिसरातील हिंद पेट्रोलपंपावर १५ एप्रिलला दुपारी २ वाजता मुकलीस मोहसीन फक्की, जावेद असमत डॉन हे दोघे दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आले होते. तेथील कामगाराने त्यांना रांगेत येण्यास सांगितल्यावर त्यांनी त्याला मारहाण केली आणि पेट्रोल ओतणाऱ्या पाईपचा ‘नोझल’ खेचला.

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ आणि ‘जगदंबा तलवार’ परत करण्याविषयी ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

ब्रिटिशांनी लुटून नेलेल्या या दोन्ही गोष्टींना ७५ वर्षांनंतर भारतात आणावे लागत असेल, हे तर केवळ मतांसाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा उदोउदो करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे !

सनातनचा साधक कु. अथर्व दिनकर पाटील ‘अभिरूप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम !

चि. अथर्वने हे यश गुरुमाऊलींच्याच कृपेमुळे म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याच कृपेमुळेच मिळाले आहे, असे सांगून गुरमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

प्रवेशद्वारावरील नाव मराठीत असण्यासाठी विश्व हिंदु परिषदेचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण !

येथील नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरील नाव उर्दू भाषेत लिहिलेले आहे. १० फेब्रुवारी २०२३  या दिवशी नगरपालिकेचे प्रशासक मा. उपविभागीय अधिकारी यांनी उर्दू भाषेतील ठराव रहित करून ‘मराठी भाषेतच लिखाण करावे’, असा नवीन ठराव केला होता; मात्र अजूनपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही.

पुणे येथे शासकीय कामकाज मराठीतूनच होणार !

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा मराठी भाषा समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपलाच विजयी करा !

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केले.

(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी

एका गुंडाच्या हत्येनंतर थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी हे कधी धर्मांध मुसलमानांच्या हातून हिंदूंची हत्या झाल्यानंतर ‘ब्र’ काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

ब्रिटीश सांसद आणि अर्थतज्ञ स्टर्न यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक !

विकास आणि वृद्धी यांविषयी एक नवा अध्याय भारताने जगासमोर ठेवला आहे, असे वक्तव्य लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे अर्थतज्ञ आणि ब्रिटीश सांसद प्रा. निकोलस स्टर्न यांनी म्हटले आहे.