जर सत्य लपवून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर ते मान्य नाही ! – हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन

जर सत्य लपवून वातावरण शांत करण्यात येत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही. त्यांना उलट लाज वाटली पाहिजे की, इतकी वर्षे सत्य लवपून का ठेवण्यात आले ? ज्ञानवापीच्या प्रकरणातील अधिवक्ते (पू.) हरि शंकर जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.

उत्तरप्रदेशात नव्या मदरशांना सरकारी अनुदान मिळणार नाही !

सरकारने यापुढे जाऊन मदरशांना मिळणारे अनुदानच बंद करून तो पैसा विकास कामांसाठी वापरावा, असेच हिंदूंना वाटते !

लखनौ शहराचे नाव पालटण्याचे योगी आदित्यनाथ यांचे सुतोवाच !

केंद्र सरकारने मुसलमान आक्रमणकारी आणि ब्रिटीश यांनी विविध शहरांना दिलेली सर्व नावे पालटून क्रूरकर्म्यांच्या मानसिक गुलामगिरीपासून देशाला मुक्त करावे, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

सर्वेक्षणाचा विस्तृत अहवाल सादर करण्यास २ दिवसांची मुदत

‘एकूण ३ दिवस सर्वेक्षण, चित्रीकरण झाले. २५० छायाचित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे प्राथमिक अहवाल सादर केला जाऊ शकतो; मात्र या सर्वांचा विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी २ दिवस लागतील’, असे सांगत मुदत मागितली. त्याला न्यायालयाने मान्यता दिली.

चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथे भीतीदायक स्वप्नांमुळे झोप येत नसल्याने चोरट्यांनी परत केल्या मूर्ती !

चोरट्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘रात्री आम्हाला भीतीदायक स्वप्न पडत आहेत. आम्ही झोपू शकत नाही. यामुळेच या मूर्ती तुमच्या घराबाहेर ठेवून जात आहोत.’ या मूर्तींचे मूल्य कोट्यवधी रुपये आहे.

श्रीकृष्णजन्मभूमी मंदिराच्या भूमीवर असलेल्या शाही ईदगाह मशिदीतील गर्भगृहही सील करावे ! – हिंदु पक्षाची मागणी

या ठिकाणी मुसलमान पक्षाकडून छेडछाड केली जाऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे येथे संरक्षण देण्याची मागणी याचिकाकर्ते महेंद्र प्रताप सिंह यांनी केली आहे.

ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामध्ये पक्षकार करण्याची हिंदु सेनेची मागणी

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ‘या खटल्यात आम्हालाही पक्षकार बनवून घ्यावे’, अशी मागणी हिंदु सेना या संघटनेकडून करण्यात आली आहे.

पुरातत्व विभागाकडून ताजमहालमधील २२ कुलूपबंद खोल्यांची छायाचित्रे प्रसारित

पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी छायाचित्रे प्रसारित करत, ‘या खोल्यांमध्ये कोणतेही रहस्य नाही. त्या केवळ रचनेचा भाग आहेत. त्या अद्वितीय नाहीत. त्यात अनेक मोगलकालीन थडगी आहेत’, असे म्हटले आहे. 

ज्ञानवापी मशिदीमध्ये मिळालेल्या पुराव्यांमुळे आमचा दावा अधिक प्रबळ झाला आहे ! – पू (अधिवक्ता) हरि शंकर जैन

ज्ञानवापी मशिदीमध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये जे काही पुरावे हाती लागले आहेत, त्यामुळे आमचा दावा अधिक प्रबळ झाला आहे.

ज्ञानवापी परिसरातील कुंडामध्ये सापडले शिवलिंग !

१२ फूट व्यास आणि ४ फूट उंच शिवलिंग !
विहीर परिसर न्यायालयाकडून सील
परिसराला पोलीस संरक्षण