उत्तरप्रदेशात नव्या मदरशांना सरकारी अनुदान मिळणार नाही !

योगी आदित्यनाथ सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – नव्या कोणत्याही मदरशाला यापुढे सरकारी अनुदान दिले जाणार नाही, असा निर्णय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतला आहे. राज्यात सध्या १६ सहस्र ४६१ मदरसे असून यांपैकी ५५९ मदरशांना सरकारी अनुदान दिले जात आहे. यातूनच मदरशांतील शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांना वेतन दिले जाते. यापूर्वी वर्ष २००३ मध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारने मदरशांना अनुदान देण्याची योजना चालू केली होती.

संपादकीय भूमिका

सरकारने यापुढे जाऊन मदरशांना मिळणारे अनुदानच बंद करून तो पैसा विकास कामांसाठी वापरावा, असेच हिंदूंना वाटते !