जयपूर (राजस्थान) येथील सनातनचे साधक सुदीप खेमका यांचे निधन
सनातनचे साधक सुदीप खेमका (वय ५८ वर्षे) यांचे सोमवार, २४ मे २०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि त्यांचे ४ भाऊ अन् १ बहिण असा परिवार आहे.
सनातनचे साधक सुदीप खेमका (वय ५८ वर्षे) यांचे सोमवार, २४ मे २०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि त्यांचे ४ भाऊ अन् १ बहिण असा परिवार आहे.
देशभरात हवाला रॅकेट चालवले जाते, हे जगजाहीर आहे; मात्र त्यातील क्वचित् एखाद्या घटनेत अशा प्रकारे पैसे सापडतात, तर अन्य व्यवहार कसे होत असतील, याची जनतेला कल्पना असेलच !
‘बिकानेरचे विवेकानंद’ या नावाने प्रसिद्ध असणारे स्वामी संवित् सोमगिरी महाराज यांना आश्रम परिसरात कोरोना नियमांचे पालन करत भू समाधी देण्यात आली. शिवबाडी मठाचे स्वामी विमर्शानंद महाराज यांनी ही माहिती दिली.
बिकानेर येथील शिवबाडी मठाचे महंत संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मेच्या रात्री बीकानेर येथे देहत्याग केला. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार करण्याचे मोठे कार्य केले.
सीकर जिल्ह्यातील खीरवा गावामधील एका कोरोनाबाधित रुग्णाचा गुजरातमधील सूरतमध्ये मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गावामध्ये आणून पुरण्यात आला. यानंतर काही दिवसांत २१ लोकांचा मृत्यू झाला.
भारतात अजूनही माणूसकी शिल्लक आहे, याचे हे एक उदाहरण ! अशा वृत्तीचे लोक देशात दुर्मिळ झाले आहेत, हेही तितकेच खरे !
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना म. गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याच्या माहितीनंतर येथे मोठ्या संख्येने त्यांचे भक्त गोळा झाले.
कोरोनाबाधित झालेल्या एका वृद्ध दांपत्याने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. ‘स्वतःमुळे स्वतःच्या नातवालाही कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी या दांपत्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.
पिलीबंगामधील काँग्रेसच्या तृतीयपंथी नगरसेविका पूनम महंत यांनी मास्क न घातल्यामुळे दोघा साधूंना मारहाण केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रसंगात पूनम महंत यांनी स्वतःच मास्क लावला नसल्याचे दिसत आहे.
काँग्रेसच्या राज्यांत धर्मांधांचा उद्दामपणा !