राजस्थानमध्ये काँग्रेसच्या तृतीयपंथी नगरसेविकेकडून मास्क न घालणार्‍या साधूंना मारहाण

स्वतः मात्र मास्क घातला नाही !

कायदा हातात घेणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून कारागृहात डांबले पाहिजे !

हनुमानगड (राजस्थान) – येथील पिलीबंगामधील काँग्रेसच्या तृतीयपंथी नगरसेविका पूनम महंत यांनी मास्क न घातल्यामुळे दोघा साधूंना मारहाण केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रसंगात पूनम महंत यांनी स्वतःच मास्क लावला नसल्याचे दिसत आहे.