बिकानेर (राजस्थान) – ‘बिकानेरचे विवेकानंद’ या नावाने प्रसिद्ध असणारे स्वामी संवित् सोमगिरी महाराज यांना आश्रम परिसरात कोरोना नियमांचे पालन करत भू समाधी देण्यात आली. शिवबाडी मठाचे स्वामी विमर्शानंद महाराज यांनी ही माहिती दिली. स्वामी संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मे या दिवशी देहत्याग केला होता.