लुधियानातील न्यायालयात बाँबस्फोट करणारा पंजाब पोलीस दलातील बडतर्फ हवालदार गगनदीप सिंग असल्याचे उघड
लुधियाना येथील न्यायालयात झालेला बाँबस्फोट गगनदीप सिंग याने घडवला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली. गगनदीप हा माजी पोलीस हवालदार असून त्याला अमली पदार्थांच्या तस्करीमुळे पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.