|
पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, हे लक्षात घेऊन ख्रिस्त्यांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून ही सुविधांची उधळण करण्यात आली आहे, हे उघड आहे ! काँग्रेसने कधी बहुसंख्य हिंदूंना अशा सोयीसुविधा दिल्या आहेत का ? – संपादक |
चंडीगड – पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी राज्यात येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. येथे बायबल आणि ख्रिस्ती धर्म यांचे शिक्षण देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक सभागृह बनवण्याचीही घोषणा मुख्यमंत्री चन्नी यांनी केली. ज्या जिल्ह्यांमध्ये ख्रिस्त्यांना कब्रस्तानासाठी भूमी उपलब्ध नाही, तेथे त्यांना ती उपलब्ध करून देण्यात येईल. ‘ख्रिस्ती वेलफेयर बोर्डा’साठी १ कोटी रुपये देण्यात येणार, तसेच ख्रिस्त्यांना वीज दरामध्ये सवलत देण्यात येणार आहे. हे सर्व निर्णय मुख्यमंत्री चन्नी यांनी राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्रा. इमॅन्युएल नाहर यांच्याशी झालेल्या बैठकीमध्ये घेतले.
Punjab will set up university chair to study Bible https://t.co/SgGcl0EhAG
— TOIChandigarh (@TOIChandigarh) December 17, 2021
ख्रिस्त्यांच्या मागण्या मान्य करणारे चन्नी हे पंजाबचे पहिले मुख्यमंत्री ! – अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्रा. इमॅन्युएल नाहर
मुख्यमंत्री चन्नी यांनी केलेल्या वरील सर्व घोषणांविषयी इमॅन्युअल नाहर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंजाबच्या एखाद्या मुख्यमंत्र्याने ख्रिस्त्यांसाठी अशी पावले उचलली आहेत. येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र असण्याविषयी आमची जुनी मागणी होती. ती मान्य करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या सर्व समस्यांचे समाधान केले आहे.