‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह नाही ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हे नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह नाही, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. तसेच न्यायालयाने या प्रकरणात ‘मुलीच्या कुटुंबियांपासून संरक्षण मिळावे’, अशी मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.