‘घराबाहेर पडू नको’ असे सांगूनही न ऐकल्याने भावाची हत्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘दळणवळण बंदी’चे प्रकरण
आपत्काळात किती संयमाने वागणे आवश्यक आहे, हे या घटनेवरून लक्षात येईल !

शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार १ मासाचे मानधन मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

कोरोनाविरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा म्हणून शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार एक मासाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे.

सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आलेले नागरिक कोरोनाबाधित

ईश्‍वरपूर येथील सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आलेल्या ५ नागरिकांना ही लागण झाल्याचे चार दिवसांपूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यातील कोरोनाची लक्षणे दिसणार्‍यांचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यामुळे आता ईश्‍वरपूर ‘हाय अलर्ट’वर आले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण विभागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य, फळे, भाजीपाला यांच्या वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर रूम’ (आपत्ती नियंत्रण कक्ष) स्थापन करण्यात आली आहे. या ‘वॉर रूम’साठी १८००२ ६७८४६६ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करणार्‍यास अटक

एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. अशा वासनांधांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

कोरोनाविरोधात लढण्यासाठी सैन्य सज्ज ! – सैन्यदल प्रमुख

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सैन्य पूर्ण सामर्थ्य देईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख मनोज नरवणे यांनी केले.

रिझर्व्ह बँकेकडून विविध कर्जांच्या व्याजदरात कपात

देशभरात दळणवळण बंदी लागू असतांना अर्थव्यवस्था आणि कर्जभार असलेल्या व्यक्ती यांना आधार देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध कर्जांच्या व्याजदरात कपात केली. मुदतीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी ३ मासांपर्यंतची सवलत दिली आहे.

‘सीएए’चे समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान करणारे धर्मांध प्राध्यापक निलंबित

येथील ‘जामिया मिलिया उस्मानिया विद्यापिठा’तील साहाय्यक प्राध्यापक अहमद अबरार यांनी ट्वीट करून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (‘सीएए’चे) समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान केले होते. याची नोंद घेत विद्यापिठाच्या प्रशासनाने त्यांना निलंबित केले.

खासगी डॉक्टरांनी चिकित्सालये बंद ठेवून रुग्णांची असुविधा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांच्या व्यतिरिक्त अन्यही रुग्ण डॉक्टरांकडे येत असतात. त्यामध्ये वयोवृद्ध, महिला, मुले असतात. त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी खासगी डॉक्टरांनी स्वत:ची चिकित्सालये बंद करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

केरळमध्ये दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

येथे दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका ३५ वर्षीय व्यसनी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. इतर वेळी हा तरुण प्रतिदिन २ ते ३ वेळा मद्य पिण्यासाठी जात होता; मात्र दळणवळण बंदी झाल्यानंतर त्याला मद्य न मिळाल्याने तो त्रस्त झाला होता.