केरळमध्ये दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

समाजाला साधना न शिकवल्याचा परिणाम !

थ्रिसूर (केरळ) – येथे दळणवळण बंदीमुळे मद्य न मिळाल्याने त्रस्त झालेल्या एका ३५ वर्षीय व्यसनी तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. इतर वेळी हा तरुण प्रतिदिन २ ते ३ वेळा मद्य पिण्यासाठी जात होता; मात्र दळणवळण बंदी झाल्यानंतर त्याला मद्य न मिळाल्याने तो त्रस्त झाला होता. केरळच्या राज्य सरकारने अत्यावश्यक वस्तूंमध्ये मद्याचा समावेश केला होता; मात्र विरोधी पक्षांनी केलेल्या विरोधानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला. यापूर्वी राज्यातील एका बंदीवानाने मद्य समजून ‘सॅनिटायझर’ प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तो पलक्कड येथील कारागृहात होता.