अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करणार्‍यास अटक

अशा वासनांधांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

अमरोहा (उत्तरप्रदेश) – येथे एका अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी साहिल नावाच्या आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलाच्या पालकांनी सांगितले की, आरोपीने त्यांच्या मुलाला आमिष दाखवून जंगलात नेले आणि तेथे हे कुकृत्य केले.