सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आलेले नागरिक कोरोनाबाधित

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोना विषाणूची लागण : जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २४

सांगली – ईश्‍वरपूर येथील आणखी १२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे अहवाल २७ मार्च या दिवशी दुपारी प्राप्त झाले. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे. त्यांच्यावर मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येणार आहेत.

ईश्‍वरपूर येथील सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जाऊन आलेल्या ५ नागरिकांना ही लागण झाल्याचे चार दिवसांपूर्वी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या ५ जणांशी संबंधित नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यातील कोरोनाची लक्षणे दिसणार्‍यांचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. यामुळे आता ईश्‍वरपूर ‘हाय अलर्ट’वर आले आहे. येथील ३९ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.