‘सीएए’चे समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान करणारे धर्मांध प्राध्यापक निलंबित

अशांना केवळ निलंबित न करता सरकारने त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे ! अशी पराकोटीची द्वेषभावना असणारे म्हणे प्राध्यापक !

नवी देहली – येथील ‘जामिया मिलिया उस्मानिया विद्यापिठा’तील साहाय्यक प्राध्यापक अहमद अबरार यांनी ट्वीट करून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (‘सीएए’चे) समर्थन करणार्‍या १५ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचे विधान केले होते. याची नोंद घेत विद्यापिठाच्या प्रशासनाने त्यांना निलंबित केले. ‘या १५ विद्यार्थ्यांना सोडून अन्य सर्वांना मी उत्तीर्ण केले. जर त्यांना उत्तीर्ण व्हायचे असेल, तर त्यांनी या कायद्याला विरोध केला पाहिजे’, असे त्यांनी म्हटले होेते. विद्यापिठाच्या अधिकार्‍यांच्या मते धार्मिक भावना भडकवण्यास असे लिखाण कारणीभूत ठरू शकते.  या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

१. या कारवाईनंतर प्रा. अबरार यांनी पुन्हा एक ट्वीट करून लिहिले, ‘‘अशी कोणतीही परीक्षा झाली नव्हती आणि कोणताही निकाल लागला नव्हता. मी केवळ एक व्यंगात्मक टीका करण्यासाठी ते ट्वीट केले होते. यातून मला दाखवायचे होते की, सरकार एकाच धर्माच्या लोकांच्या विरोधात भेदभाव करत आहे. मी लोकांना आवाहन करतो की, त्यांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे. मी कधीही भेदभाव केलेला नाही.’’ (आज ‘अशा प्रकारचे ट्वीट केवळ व्यंगात्मक आहे’, असे म्हणणारे उद्या प्रत्यक्षात तशी कृती करूही शकतात, असे का समजू नये ? – संपादक)

२. यानंतर विद्यापिठाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, जरी परीक्षा झाली नसली किंवा निकाल लागले नसले, तरी अशा प्रकारचे लिखाण प्रा. अबरार कसे करू शकतात ? विद्यापिठाची अपकीर्ती केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल.