क्रांतीवर दीपाजी राणे यांच्या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्या !

क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगिजांच्या विरोधात नाणूस किल्ल्यावर क्रांती केली होती. या पहिल्या सशस्त्र क्रांतीला संपूर्ण भारतात प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्यायला हवी, अशी मागणी मराठी राजभाषेचे कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी यांनी केली.

१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा रहित !

१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्‍यांचा मोर्चा रहित करण्यात आला आहे. देहलीत झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

चीनचा अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याधिकारी तिबेटी संस्कृतीचा अभ्यास करणार !

चीनकडून चालू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने तिबेटचा इतिहास, तेथील संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती बनवली आहे.

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या मंडपाचे भूमीपूजन

शहरातील भालचंद्र महाराज संस्थानलगतच्या रस्त्यावर कायमस्वरूपी मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले.

देहली महामार्ग रिकामा करा !  

येथील सिंघू सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या विरोधात येथील स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत निदर्शने केली. त्यांनी ‘देहली महामार्ग मोकळा करा’, अशी मागणी केली. गेल्या २ मासांपासून शेतकरी येथे ठाण मांडून आहेत.

कृतीदलाचा अहवाल आल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीवर निर्णय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कृतीदलाचा अहवाल आल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीवर निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्याने बोलतांना २७ जानेवारीला विधानसभेत दिली.

विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभेत लोकायुक्त दुरुस्ती विधेयक संमत

लोकायुक्त दुरुस्ती विधेयकांमुळे लोकायुक्तांचे अधिकार न्यून होणार आहेत. हे विधेयक संमत करण्याऐवजी ते सिलेक्ट समितीला पाठवावे, अशी विरोधकांनी मागणी केली; मात्र विरोधकांची मागणी धुडकावून विधानसभेत हे विधेयक संमत करण्यात आले.

मार्च अखेर सनबर्न महोत्सव साजरा करण्याविषयी आयोजकांकडून शासनाला अर्ज

गोव्यात २७ ते २९ मार्च या कालावधीत सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टीव्हलचे आयोजन करण्यास अनुमती देण्याची मागणी करणारा अर्ज महोत्सवाच्या आयोजकांनी शासनाला दिला आहे. या वृत्ताला पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनीही दुजोरा दिला आहे.

लेखी आश्‍वासनानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचे आंदोलन अखेर मागे

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतील सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीवरून स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक कुटुंबियांनी २२ जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले होते.

सिंधुदुर्गातील कोरोनाची स्थिती

जिल्ह्यात २४ घंट्यांत नवीन २२ रुग्ण आढळले असून एकूण ५ सहस्र ८२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार चालू आहेत. ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.