१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा रहित !

नवी देहली – १ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्‍यांचा मोर्चा रहित करण्यात आला आहे. देहलीत झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय किसान युनियनचे बलबिरसिं राजेवाल म्हणाले की, शेतकरी आंदोलनाच्या अंतर्गत हुतात्मा झालेल्यांसाठी आम्ही देशभरात मोर्चे काढणार आहोत. आम्ही एक दिवसाचा उपवासही करणार आहोत.

राजेवाल यांनी सरकारवर आरोप करतांना म्हटले की, सरकारच्या कट कारस्थानामुळे ट्रॅक्टर मोर्चा अपयशी ठरला. यामध्ये अडथळे आणण्याचे सरकारने प्रयत्न केले. यामध्ये ९९.९० टक्के लोक हे शांततेत आंदोलन करत होते; मात्र काही चुकीच्या घटना घडल्या. सरकारने आमच्यासमोर अनेक अडथळे निर्माण केले; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.