भारत पुन्हा चिनी आस्थापनांच्या गुंतवणुकीला मान्यता देण्याची शक्यता

चीन विश्‍वासघातकी देश असल्याने त्याच्याशी अधिकाधिक कठोर होऊन त्याच्यावर दबाव निर्माण करण्यासह त्याच्या सर्वच वस्तूंवर बंदी घालण्याची आवश्यकता असतांना जर अशी मान्यता दिली जात असेल, तर तो आत्मघाती निर्णय ठरेल !

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराकडील ४५० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त

हिंदु राष्ट्रात अशांवर कठोर कारवाई करून सर्व बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात येईल !

हरिद्वार कुंभमेळ्याची मानक संचालन प्रक्रिया रहित करण्यासाठी धरणे आंदोलन

कुंभच्या मानक संचालन प्रक्रियेच्या (एस्.ओ.पी.च्या) विरोधात व्यापार्‍यांनी सुभाषघाटावर अनिश्‍चितकालीन धरणे प्रारंभ केले आहे. व्यापार्‍यांनी कोरोना चाचणीचा अहवाल आणि नोंदणी अनिवार्य केल्याने त्यांनी कुंभनगरीमध्ये जाण्यास नकार दिला आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते ‘युवा गंधर्व’ पुरस्काराचे वितरण

सुंद्रीकला अकादमीच्या वतीने येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केलेल्या संगीत प्रतिभा महोत्सवात सुंद्रीवादन, कथ्थक, भरतनाट्यम्, मोहिनी अट्टम आदी विविध संगीतांच्या कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले ! – चंद्रकांत पाटील, भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष मुसलमान विरोधी नसून नरेंद्र मोदी यांनीच भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्र्रपती केले, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळेच इंधन आणि गॅस यांची भाववाढ ! – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

कोरोना काळातील लसीकरण, किसान सन्मान योजना, विनामूल्य गॅसचे वाटप या योजना राबवल्याचे मोदी सरकार सांगत आहे; परंतु सरकारी तिजोरीतून वाटलेल्या पैशांहून अधिक पैसे मोदी सरकारने जनतेच्या खिशातून काढले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वीजजोडणी तोडण्याच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी ! – चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप

भाजपचे वाढीव वीजदेयकाच्या विरोधातील आंदोलन स्थगित. येत्या २४ फेब्रुवारीपासून भाजपच्या वतीने भरमसाठ वीजदेयक वाढीच्या सूत्रांवरून ‘कारागृह भरा’ आंदोलन केले जाणार होते.

भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम साधत मिरजेत भावपूर्ण वातावरणात कृष्णामाई उत्सव साजरा !

भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम साधत मिरजेत कृष्णामाई उत्सव साजरा करण्यात आला. मिरजेतील ऐतिहासिक कृष्णा घाट येथे मार्कंडेय मंदिराच्या घाटावर या उत्सवात प्रथम २० फेब्रुवारी या दिवशी घाट, नदी पात्राची वाट यांची स्वच्छता करण्यात आली.

भक्ती, शक्ती आणि युक्ती या त्रिसूत्रींनुसार युवकांनी जीवनात वाटचाल करावी ! – ह.भ.प. सोपानमहाराज भारमल

छत्रपती शिवाजी महाराज जीवनातील अडचणींना सामोरे जातांना कधीही डगमगले नाहीत. आई तुळजाभवानीचा नामजप, सतत युद्धाभ्यास आणि वेळप्रसंगी युक्तीने गनिमी कावा यांचा उपयोग करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत आहे !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाविषयी नागरिकांना दिलासा द्यायचे सोडून राज्य सरकार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.