महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत आहे !

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका

प्रवीण दरेकर

कात्रज (पुणे) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाविषयी नागरिकांना दिलासा द्यायचे सोडून राज्य सरकार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. कात्रज परिसरातील भाजप नगरसेविका रंजना टिळेकर आणि माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

केंद्रातील सरकार नागरिकांची काळजी करत आहे; पण राज्यातील सरकार मात्र फडणवीस सरकारने आणलेल्या योजनांना स्थगिती देण्यात गुंतले आहे, असेही ते म्हणाले. पुणे महापालिकेत १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतांना जेवढी कामे झाली नाहीत, तेवढी कामे मागील ४ वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केली असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ४१ चे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.