स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पाण्याची समस्या हा गंभीर विषय ! – उद्धव ठाकरे

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथे २२ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केली.

श्रीराम मंदिराची मोहीम कोरोनाचे नियम पाळून राबवली जाऊ शकते ! – मद्रास उच्च न्यायालय

शासनाने घेतलेल्या भूमिकेस मान्यता देता येत नाही, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या जिल्हा संयोजकांना मदुराई येथील त्यांच्या वाहनाद्वारे श्रीराममंदिराविषयी जनजागृती मोहीम राबवण्याची अनुमती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बैठक घेऊन काँग्रेसकडून हरताळ !  

२३ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र काँग्रेस समितीकडून राज्य निवड मंडळ बैठक बोलावण्यात आली होती; मात्र या बैठकीत कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडालेला पाहिला मिळाला.

सोनम वांगचूक यांनी निर्माण केले लडाख सीमेवरील सैनिकांसाठी खास तंबू !

लडाखमधील सोनम वांगचूक यांनी तेथील बर्फाच्छादित सीमेवर तैनात सैनिकांसाठी थंडीपासून बचाव करणार्‍या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. संपूर्णपणे देशी बनावटीचे ‘सोलर हिटेड मिलेट्री टेन्ट’ नावाचे हे तंबू सौरऊर्जेवर हिटरचा वापर करून बनवण्यात आले आहेत.

नियमांचे पालन होत नसल्याच्या दु:स्थितीविषयी महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

शासकीय परिपत्रक काढून नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणार्‍या मंत्रालयातच कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा वाजले आहेत. याविषयी महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेचे सरचिटणीस विष्णु पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना मंत्रालयातील दु:स्थितीविषयी अवगत केले आहे.

माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची नित्योपचार पूजा पार पडली 

माघ एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांच्या उपस्थितीत, तर श्री रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गलिच्छ राजकारण झाले ! – वनमंत्री संजय राठोड 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गलिच्छ राजकारण झाले, अशी प्रतिक्रिया राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी या दिवशी पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना दिली. या प्रकरणावर राठोड यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.

अ‍ॅक्युप्रेशर या चिकित्सा पद्धतीवर कोल्हापूर येथील वृत्तवाहिनी बी न्यूजवर संवाद-प्रतिवाद चर्चासत्रात सनातनचे साधक डॉ. उमेश लंबे यांचा सहभाग !

डॉ. लंबे यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा मूलाधार ग्रंथ सनातनचे प्रकाशन १. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन २. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार ३. हातापायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन या ग्रंथांतील माहितीचा उपयोग करून ती सांगितली.

जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या पुढाकाराने मेंढपाळाला आर्थिक साहाय्य !

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे रंगराव बाबू जोंग (रहाणार राशिवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या वयोवृद्ध मेंढपाळाने एका शेतात मेंढ्यांचा कळप उतरवला होता.

कोरोनामुळे मुंबईतील ८७६ इमारती सील; प्रतिदिन सरासरी ६४४ रुग्ण

८ फेब्रुवारी या दिवशी रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ५७४ दिवस इतका होता, तो आता २१ फेब्रुवारीपर्यंत ३२१ दिवसापर्यंत घसरला आहे. मुंबईत बरे होणार्‍या रुग्णांचा दर ९४ टक्के इतका आहे.