मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराकडील ४५० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त

देशातील एका आमदाराकडे इतकी बेहिशोबी संपत्ती सापडते, तर देशातील अन्य भ्रष्ट लोकप्रतिनिधींकडे किती संपत्ती असेल, याची कल्पना करता येत नाही ! हिंदु राष्ट्रात अशांवर कठोर कारवाई करून सर्व बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात येईल !

काँग्रेसचे भ्रष्ट आमदार निलय डागा

नवी देहली – आयकर विभागाने मध्यप्रदेशातील बैतूल येथील काँग्रेसचे आमदार निलय डागा आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बैतूल, सतना, मुंबई, सोलापूर आणि कोलकाता येथील २२ ठिकाणांवर धाडी घातल्या. यातून ४५० कोटी रुपयांच्या बेहिशोबी संपत्तीची माहिती मिळाली आहे.

यात ८ कोटी रुपये रोख, तर ४४ लाख रुपयांहून अधिक विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. डागा यांचा सोया उत्पादनांचा व्यवसाय आहे. त्यांच्या आस्थापनातील गडबडीवरून ही धाड घालण्यात आली.