कोल्हापूर जिल्ह्यात गृह मतदानाला प्रारंभ !

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला  मतदान होत आहे. तत्पूर्वी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

१५ मिनिटांचे एकच उत्तर – १०० टक्के मतदान !

काही दिवसांपूर्वी अकबरूद्दीन ओवैसींनी सभेमध्ये वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानाला कापडी फलकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

पन्हाळा गडावर ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम शौर्यपूर्ण वातावरणात पार पडली !

नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी उपस्थितांना शिवा काशीद यांच्या बलीदानाचा प्रसंग आणि त्यातून प्रेरणा कशी घ्यायची ? हे विशद करून सांगितले. 

वैकुंठचतुर्दशीच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची करण्यात आलेली विशेष रूपातील पूजा !

जोपर्यंत देशात अखंड एकता आहे, तोपर्यंत भारताला कुणीही तोडू शकत नाही ! – माधवी लता, भाजप नेत्या

माधवी लता पुढे म्हणाल्या की, भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जाते; कारण येथे श्रीमंत-गरीब, उच्च-नीच भेदभाव नाही; मात्र काही जण सरकार बनवण्याच्या नादात रावण बनत आहेत. त्यामुळे भारतातच मोगल निर्माण होत आहे.

निवडणूक विशेष

ऐरोली विधानसभा मतदारसंघातील कोपरखैरणे सेक्टर – ८ येथील २५० मतदारांची नावे वगळण्यात आली असून त्यांचा अन्य ठिकाणच्या मतदारसूचीत समावेश करण्यात आला आहे.

श्री भवानीमातेच्या दर्शनाने ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृतीला तुळजापूर येथून प्रारंभ

महाराष्ट्राची कुलदेवता श्री भवानीमातेच्या दर्शनाने १३ नोव्हेंबर या दिवशी तुळजापूर येथून ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृती मोहिमेला प्रारंभ झाला. ढोल, ताशे, डमरू आदी पारंपरिक वाद्यांचा गजर करत श्री भवानीमातेच्या आशीर्वादाने ‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृतीला शुभारंभ झाला.

हद्दपारीचे साधारणत : ५० हून अधिक प्रस्तावही मान्य !

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीचे साधारणत: ५० हून अधिक प्रस्तावही मान्य करण्यात आले आहेत. आतापर्यंत २ कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या आवारात शिरस्त्राणसक्ती करण्याचा आदेश !

जनतेला शिस्त न लावल्यामुळे किमान ‘महापालिकेच्या आवारात तरी शिरस्त्राणसक्ती करा’, असा आदेश काढावा लागणे, हे दुर्दैवी !

Sant Sammelan Solapur Maharashtra : हिंदु राष्ट्र निर्माणासाठी देशभरातील हिंदू आता जागा होत आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

हिंदुत्वनिष्ठ विचारांनीच भगवा फडकवता येणार आहे. तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये गोमातेची चरबी मिसळण्याचे काम करणारे, तरुणींची जनावरांप्रमाणे कत्तल करणार्‍यांनाही धडा शिकवावा लागणार आहे.