कर्नाटकमधील दंगलीत घायाळ झालेल्या मुसलमान महिलेने हानीभरपाईचे पैसे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकले !

सिद्धरामय्या यांनी देऊ केली होती हानीभरपाई !

वृत्तसंकेतस्थळांसाठी केंद्रशासन आता नवीन कायदा आणणार !

वृत्तसंकेतस्थळांना करावी लागणार नोंदणी
१५५ वर्षे जुना कायदा रहित करणार

गुजरात दंगलीनंतर भाजपचे सरकार पाडण्यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी कट रचला होता !

विशेष अन्वेषण यंत्रणेचे सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र
तिस्ता सेटलवाड यांचाही होता सहभाग !

रुबिया यांनी अपहरण करणार्‍या यासीन मलिक याला न्यायालयात ओळखले !

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी आणि मेहबूबा मुक्ती यांची बहीण रुबिया सईद हिचे अपहरण आतंकवादी यासीन मलिक याने केल्याचे रुबिया हिने सांगितले.

‘मटर पनीर’ऐवजी ‘चिकन करी’चे पार्सल पाठवल्याने हॉटेलला द्यावी लागणार २० सहस्र रुपये हानीभरपाई !

एका हिंदु शाकाहारी कुटुंबाने ‘जीवाजी क्लब’ नावाच्या हॉटेलमधून शाकाहारी पदार्थ मागवला असतांना त्यांना ‘झोमॅटो’ या घरपोच अन्न पोचवणार्‍या आस्थापनाकडून मांसाहारी जेवण मिळाले. हे पाहून त्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला, तसेच त्यांना अन्नग्रहण करता आले नाही.

डोडा (जम्मू-काश्मीर) येथे शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

गेल्या २-३ मासांत राज्यातील ८ मंदिरांत तोडफोड; मात्र कुणालाही अटक नाही !

महंमद जुबैर याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत  

‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबैर याला देहली पोलिसांनी ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला. यासमवेतच अनुमती घेतल्याविना त्याच्या देश सोडून जाण्यावर बंदी घातली.

(म्हणे) ‘भगतसिंह आतंकवादी होता !’

पंजाबमधील खलिस्तानी मानसिकतेचे शीख नेते आता उघडपणे अशा प्रकारची विधाने करू लागले आहेत. ही पुढे येणार्‍या मोठ्या संकटाची सूचना आहे. केंद्र सरकारने यावर आताच लक्ष देऊन कारवाई करणे आवश्यक आहे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे यावर्षी १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना !

जिल्ह्यात यावर्षी जानेवारी २०२२ ते १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना घडल्या आहेत. याविषयी बाल कल्याण समितीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील बहुतांश मुलींनी सांगितले की, त्यांना अंधारात ठेवण्यात आले आणि त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.

चेन्नई येथे ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या (हिंदु आघाडीवरच्या) साप्ताहिक बैठकीत करण्यात आले ‘हिंदु राष्ट्रा’विषयी मार्गदर्शन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादानेच अनेक अडथळ्यांवर मात करत आपण हिंदुत्वाचे कार्य करू शकतो’, असे ‘भारत हिंदु मुन्नानी’चे संस्थापक अध्यक्ष श्री. आर्.डी. प्रभु यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.