वर्ष १९८९ मध्ये रुबिया सईद यांच्या आतंकवाद्यांनी केलेल्या अपहरणाचे प्रकरण
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी आणि मेहबूबा मुक्ती यांची बहीण रुबिया सईद हिचे अपहरण आतंकवादी यासीन मलिक याने केल्याचे रुबिया हिने सांगितले. तिने न्यायालयात यासीन मलिक आणि अन्य ३ आतंकवाद्यांना ओळखले. या प्रकरणात न्यायालयाने तिला न्यायालयात उपस्थित रहाण्यास सांगितले होते. सध्या ती तमिळनाडूमध्ये रहात आहे. ८ डिसेंबर १९८९ या दिवशी रुबिया यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात ५ आतंकवाद्यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या वेळी मुफ्ती महंमद सईद देशाचे गृहमंत्री होते. ५ आतंकवाद्यांना सोडल्यानंतर रुबिया यांची सुटका करण्यात आली.
Rubaiya, daughter of former J&K CM Mufti Mohammad Sayeed, was abducted from a minibus in Srinagar on December 8, 1989. She was released in exchange for five jailed militants.https://t.co/lR9Ep8PXJN
— The Indian Express (@IndianExpress) July 15, 2022