चेन्नई – ‘भारत हिंदु मुन्नानी’या संघटनेने येथील श्री अंगलापरमेश्वरी मंदिर, पट्टलम् येथे १० जुलै २०२२ या दिवशी नियमित साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. आर्.डी. प्रभु यांच्या विनंतीवरून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना आणि त्याच्या स्थापनेसाठी साधनेचे महत्त्व’ विषद केले. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता सीताराम कलिंगा यांनीही बैठकीमध्ये सहभाग घेतला आणि ‘हिंदु उपक्रमांसाठी आवश्यक असलेला कायदेशीर दृष्टीकोन’ याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी ‘हिंदु उपक्रमांना आवश्यक ते सर्व कायदेशीर पाठबळ देईन’, असे आश्वासन दिले. श्री. आर्.डी. प्रभु यांनी भारत हिंदु मुन्नानीच्या कार्यकर्त्यांना ‘धर्मविरोधी शक्तींना प्रभावीपणे कसे निपटावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या वतीने ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बालाजी कोल्ला यांनी ‘गुरु आणि गुरुपौर्णिमा यांचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतला.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादानेच अनेक अडथळ्यांवर मात करत आपण हिंदुत्वाचे कार्य करू शकतो’, असे ‘भारत हिंदु मुन्नानी’चे संस्थापक अध्यक्ष श्री. आर्.डी. प्रभु यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. |