कर्नाटकमधील दंगलीत घायाळ झालेल्या मुसलमान महिलेने हानीभरपाईचे पैसे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकले !

सिद्धरामय्या यांनी देऊ केली होती हानीभरपाई !

काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या (डावीकडे)

बागलकोट (कर्नाटक) – येथे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी दंगलीच्या प्रकरणी घायाळ झालेल्या मुसलमान महिलेला २ लाख रुपये हानीभरपाई देऊ केल्यावर तिने ते पैसे सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकून दिले. या महिलेने ‘शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली करा’, असे त्यांना सुनावले. या दंगलीत ४ मुसलमान घायाळ झाले होते. त्यांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची घोषणा सिद्धरामय्या यांनी केली होती.

संपादकीय भूमिका

दंगलीत हिंदू घायाळ झाले असते, तर सिद्धरामय्या किंवा काँग्रेसचे अन्य नेते कधी त्यांना हानीभरपाई देण्यास गेले असते का ? आतापर्यंत काँग्रेसने कधी असे केले आहे का ?