गेल्या २-३ मासांत राज्यातील ८ मंदिरांत तोडफोड; मात्र कुणालाही अटक नाही !
डोडा (जम्मू-कश्मीर) – येथील शिवमंदिरात अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली. या मंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीचे हात आणि पाय तोडण्यात आले. स्थानिक हिंदूंमध्ये हे मंदिर ‘छोटा मणी महेश’ या नावाने ओळखले जाते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस चौकशी करत आहेत. हे मंदिर मुख्य मार्गापासून १० किलोमीटर आतमध्ये आहे.
Jammu: Another temple vandalised in Doda district, idol desecrated; FIR registered https://t.co/4LbeKo4bXg
— Republic (@republic) July 15, 2022
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
..तर उपराज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करू ! – हिंदु संघटनांची चेतावणी
या घटनेनंतर हिंदूंच्या संघटनांनी निदर्शने करत राज्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्र सरकार यांचे पुतळे जाळले. या निदर्शकांनी सांगितले की, गेल्या २-३ मासांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंच्या ८हून अधिक मंदिरांमध्ये तोडफोड करण्यात आली; मात्र आतापर्यंत एकाही आरोपीला पोलीस अटक करू शकलेले नाहीत. (अशा अकार्यक्षम पोलिसांना बडतर्फच केले पाहिजे ! – संपादक) यामुळे हिंदूंमध्ये आक्रोश आहे. केंद्रशासनाने आम्हाला अधिक कठोर निदर्शने करण्यास बाध्य करू नये. अशा घटना अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात घडल्या असत्या, तर तात्काळ कारवाई झाली असती. जर मंदिरांत तोडफोड करणार्यांना अटक केली नाही, तर आम्ही उपराज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करू, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
यापूर्वी ८ एप्रिल या दिवशी लक्ष्मीनारायण मंदिर, ५ मे या दिवशी वासुकी मंदिर, तर ११ जुलै या दिवशी हनुमान मंदिर यांमध्ये तोडफोड करण्यात आली होती. तेव्हाही हिंदू संघटनांनी आंदोलन केले होते. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले होते.
संपादकीय भूमिका
|