वागळे (चाळीसगाव) येथे पाटलीपुत्र एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले !

चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या जवळच्या वागळे गावाजवळ एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले. या घटनेत कुठलीही जीवित किंवा अनुचित घटना घडलेली नाही.

मुंबईमधील २३६ प्रभागांसाठी २९ जुलै या दिवशी आरक्षण सोडत !

महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत २९ जुलै या दिवशी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृह येथे काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या सोडतीमध्ये इतर मागासवर्गासाठी ६३ प्रभागांतील आरक्षण आणि महिला आरक्षण घोषित होणार आहे.

कृष्णा नदीत सातत्याने होणार्‍या माशांच्या मृत्यूप्रकरणी हरित लवादात याचिका !

साखर कारखान्यांच्या मळीमिश्रित घातक रसायनांमुळे कृष्णा नदीत लाखो मासे मृत होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याला प्रशासकीय यंत्रणेची अनास्थाच कारणीभूत आहे. याकडे सातत्याने डोळेझाक करणार्‍या यंत्रणांच्या विरोधात ‘स्वतंत्र भारत पक्षा’चे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

शिवसेनेच्या वतीने पुरातत्व विभागाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ सेनापती कापशी (कोल्हापूर) येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन !

गड-दुर्गांवरील अतिक्रमणे आणि पडझड यांविषयी सुस्त असणारा पुरातत्व विभाग बंद का करू नये ?

सोलापूर येथे मराठी जैन साहित्य संमेलनाचे आयोजन !

महाराष्ट्र जैन परिषदेचे २५ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे २९, ३० आणि ३१ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘बाबासाहेब पुरंदरे यांचे विकृत लिखाण शिवाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यासाठी होते !’

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ज्या पक्षाने अफझलखान वधाचे चित्र हटवण्यास भाग पाडून खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी बोलणे हास्यास्पद होय.

कोरोनाच्या काळात विधानसभेच्या कामकाजात महाराष्ट्र १० व्या स्थानी, केवळ २२ दिवस कामकाज !

कोरोनाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या विधानसभेचे कामकाज केवळ २२ दिवस झाले. देशभरातील एकूण १९ राज्यांतील विधानसभेच्या कोरोनाच्या कालावधीत झालेल्या कामकाजाच्या तुलनेत महाराष्ट्र १० व्या स्थानावर गेला असल्याचे २६ जुलै या दिवशी ‘प्रजा फाऊंडेशन’ने पत्रकार परिषद घेऊन सांगितले

मुलांना आरोग्यदायी आणि संस्कारक्षम घडवा !

‘दशसूत्री’ मुलांच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे. १० सहस्र शिक्षकांना ‘दशसूत्री’ कार्यक्रम समजावून देण्यात येत आहे. सध्या ‘जंकफूड’मुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे पालकांचाही दृष्टीकोन पालटण्याचा प्रयत्न आहे.

लोकमान्य टिळक यांच्या जगण्यातून ध्येयनिष्ठा शिकायला हवी ! – पार्थ बावस्कर, इतिहास अभ्यासक

आजच्या तरुणांनी टिळकांच्या जगण्यातून आधुनिक मूल्यांचा स्वीकार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि ध्येयनिष्ठा शिकायला हवी, असा सल्ला व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी दिला

तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पारपत्र कार्यालयाची सेवा विस्कळीत !

सर्व्हरच्या कामात अडथळे आल्यामुळे ही गैरसोय झाल्याचे पारपत्र कार्यालयाने स्पष्ट केले. पुण्यासह परभणी, गोवा आणि गुजरात येथेही पारपत्र कार्यालयांचे काम काही घंटे बंद होते.