Shri Vitthal Rukmini Temple:गाभार्‍याचे काम १० टक्केही पूर्ण नाही, तसेच कामाच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचा एकही सक्षम अधिकारी उपस्थित नाही ! – ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज

गाभार्‍यातील ग्रॅनाईट काढून मूळ स्वरूप देण्यासाठी श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते; मात्र गेल्या ४५ दिवसांत केवळ ग्रॅनाईटच काढलेले आहे. गाभार्‍यातील कामाला प्राधान्य देण्यात आलेले नाही.

सिंधुदुर्ग : वन्य प्राण्यांसाठी सावंतवाडी वन विभागाने ३५ ठिकाणी निर्माण केले पाणवठे !

मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण यांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याचा परिणाम वन्य प्राण्यांना खाद्यासह मुख्यत्वेकरून पाणी मिळण्यावर होत आहे.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला नरेंद्र मोदी यांनी होकार दिला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रीपदाचे दायित्व एकनाथ शिंदे समर्थपणे सांभाळत आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससमवेत जातील, असे कधीच वाटले नव्हते. अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा शब्द आम्ही त्यांना कधीही दिला नव्हता.

महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे ! – नवनीत राणा, खासदार

काँग्रेस निवडून यावी, असे पाकिस्तानला वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला मत म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केले.

सरकता जिना अचानक उलटा फिरल्याने प्रवाशांचा गोंधळ !

दिवा स्थानकावरील सरकता जिना अचानक उलटा फिरला. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. आधी तो विजेअभावी बंद होता. वीज आल्यावर जिना वर जाण्याऐवजी मागे जाऊ लागला.

शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या गैरसमजातून दोघा भिक्षुकांना जमावाकडून मारहाण !

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हे संशयित तरुण भिक्षुक असून कुटुंबियांसह त्यांचे मिरज येथील कृपामयी रुग्णालयाजवळील झोपडपट्टीत वास्तव्य असल्याचे समोर आले.

छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकी तरुणी घरातून चालवत होती गर्भलिंग निदान केंद्र !

आजच्या तरुणांची फसवेगिरी ! अशांना कठोर शिक्षाच हवी !

यापुढे मी निवडणूक लढणार नाही ! – एकनाथ खडसे

या वेळी एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते; मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता काळात १३ कोटी हून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त !

जप्त झालेली रक्कम आणि वस्तू यांचे मूल्य एवढे आहे, तर जप्त न झालेल्या किती असतील, याची कल्पना न केलेली बरी !

पुणे येथील मुसलमान मौलानांचा एम्.आय.एम्.चे उमेदवार अनिस सुंडके यांना जाहीर पाठिंबा !

पुण्यातील विविध मशिदींमधील सदस्यांकडून विविध मुसलमानांना धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतील मशिदींमधून हिंदुत्वाच्या विरोधात फतवा काढला जात आहे.