
कणकवली – जागतिक आरोग्य संस्था आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांनी मान्यता दिलेले ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांवर बसवावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणार्या गणेशभक्तांसाठी ही चाचणी विनामूल्य करण्यात यावी किंवा ५० ते ७० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी. या यंत्रणेद्वारे १५ ते ३० मिनिटांत अहवाल प्राप्त होत असल्याने प्रशासनावरील ताण अल्प होणार आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठीचा खर्च शासनाकडून प्राप्त झालेल्या कोरोनासाठीच्या निधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून करण्यात यावा.’
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद