राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या विधानाचा शिवसेनेकडून निषेध

सावंतवाडी – छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले होते. त्यावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना ‘सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’, असे सांगितले. यावर शिवसेनेने ‘हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान असून तमाम शिवप्रेमींच्या, तसेच शिवसेनेच्या भावना दुखावल्या आहेत’, असे सांगत नायडू यांच्या विधानाचा निषेध केला. याविषयीचे निवेदन शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना सादर केले. या वेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, अशोक दळवी, योगेश नाईक, अजित सांगेलकर आदी उपस्थित होते.