शिरूर (जिल्हा पुणे) – बकरी ईद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुभाष जांभळे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत.