कोकणात येणार्‍या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडा ! – भाजपचे नेते नीलेश राणे यांची मागणी

मालवण – गणेशचतुर्थीच्या काळात कोकणात येणार्‍या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

‘कोकणात गणेशचतुर्थीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो; मात्र कोरोनाच्या महामारीमुळे गणेशभक्तांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता रेल्वेचा प्रवास सुरक्षित वाटतो. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वेगाड्या चालू कराव्यात’, असे या निवेदनात म्हटले आहे.