होडावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले

वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अदिती अरविंद नाईक यांच्यावर कर्तव्यचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले आहे.

सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती

भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार, त्यांचा वाहनचालक आणि अन्य एक अशा तिघांचा कोरोनाविषयीचा अहवाल सकारात्मक आला आहे. जठार हे त्यांच्या कासार्डे येथील घरी गृहअलगीकरणात आहेत.

आकाशात सायंकाळी पश्‍चिम दिशेला होत आहे गुरु आणि शनि यांचे दर्शन !

गेल्या १६ डिसेंबरपासून सायंकाळी आकाशात पश्‍चिम दिशेला गुरु आणि शनि ग्रह यांचे दर्शन होत आहे. २१ डिसेंबरला हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून केवळ ०.१ अंशांवर आले होते. या दोघांमधील अंतर काही शे किलोमीटर असले, तरी पृथ्वीवरून पहातांना ते अगदी जवळ आल्याचे वाटत होते.

ब्रिटनमधून आलेले २९९ प्रवासी मुंबईतील उपाहारगृहांमध्ये विलगीकरणात

विदेशातून येणार्‍या प्रवाशांची विमानतळांवर पडताळणी केली जात आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यास त्यांना सेव्हन हिल रुग्णालय, तर युरोप आणि आखाती देशांतून आलेल्या अन् लक्षणे असलेल्या प्रवाशांना जी.टी. रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

भिवंडी येथून १ कोटी १३ लाख ७९ सहस्र रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा हस्तगत

ब्राऊन शुगरसह अमली पदार्थांची तस्करी करणारे जाहीद शेख (वय ३० वर्षे) आणि ईश्वर मिश्रा (वय ३९ वर्षे) यांना भिवंडी पिसे रस्त्यावरील सावद येथून ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ३ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर गुन्हा नोंद

आरोपींनी स्वतःच्या अधिकारांचा अपवापर करून अवास्तव आणि १३ खोटी कर्ज प्रकरणे संमत केलेली आहेत. 

दत्त जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यावर भाविकांना निर्बंध, तर पर्यटकांना मात्र सवलत

नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या निमित्ताने गड-किल्ल्यांवर होणार्‍या ‘मद्य पार्ट्या’ यांवर अजून तरी कोणतेही निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. हा पोलिसांचा दुटप्पीपणा नव्हे का ?

नववर्षाच्या वेळी सरकारी नियमांचे पालन होते कि नाही, हे पहाण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची १४ पथके सिद्ध

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षित वावर, तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत आहे कि नाही, याची पडताळणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे.

पालकमंत्री जयंत पाटील शिवसैनिकांना दुय्यम वागणूक देतात ! – सांगलीतील शिवसैनिकांची तक्रार

या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईन आणि त्यांच्यापुढे आपले गार्‍हाणे मांडीन’, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.

गतीरोधक करण्यासाठी मिरज-माधवनगर रस्त्यावर भाजपच्या वतीने रस्ता बंद आंदोलन

गतीरोधकाच्या मागणीसाठी आमदारांना आंदोलन का करावे लागते ? असे प्रशासन सामान्यांना न्याय काय देणार ?