
सांगली, २३ डिसेंबर (वार्ता.) – मिरज-माधवनगर यशवंतनगरमार्गे जाणार्या रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. ते अल्प होण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही गतीरोधक करण्यात येत नव्हते. गतीरोधकाच्या मागणीसाठी भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज-माधवनगर रस्त्यावर भाजपच्या वतीने रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांनी निवेदन स्वीकारून त्वरित काम चालू करण्याचे आश्वासन दिले, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिवे लावण्याचेही मान्य केले. (गतीरोधकाच्या मागणीसाठी आमदारांना आंदोलन का करावे लागते ? असे प्रशासन सामान्यांना न्याय काय देणार ? – संपादक) या वेळी नगरसेवक प्रकाश ढंग आणि श्री. राजेंद्र कुंभार, सर्वश्री विशाल मोरे, रवींद्र सदामते, सुभाष गडदे, कृष्णा राठोड, चेतन माडगूळकर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत