आकाशात सायंकाळी पश्‍चिम दिशेला होत आहे गुरु आणि शनि यांचे दर्शन !

अवकाश दर्शन करणार्‍यांना पर्वणी !

मुंबई – गेल्या १६ डिसेंबरपासून सायंकाळी आकाशात पश्‍चिम दिशेला गुरु आणि शनि ग्रह यांचे दर्शन होत आहे. २१ डिसेंबरला हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून केवळ ०.१ अंशांवर आले होते. या दोघांमधील अंतर काही शे किलोमीटर असले, तरी पृथ्वीवरून पहातांना ते अगदी जवळ आल्याचे वाटत होते. या घटनेला खगोलीय इंग्रजी भाषेत ‘ग्रेट कन्जेक्शन’ असे म्हणतात. आताही सायंकाळी या दोन्ही ग्रहांना पश्‍चिम दिशेला साध्या डोळ्यांनी पहाता येत आहे. सूर्यास्तानंतर सायंकाळी साडेसातपर्यंत त्यांना पहाता येऊ शकते. ज्यांना शक्य आहे ते दुर्बिण किंवा टेलिस्कोप यांचाही वापर करू शकतात. यानंतर हे दोन्ही ग्रह इतक्या जवळ थेट १५ मार्च २०८० मध्ये येणार असल्याने ही आताची दुर्मिळ घटना आहे. यापूर्वी हे दोन्ही ग्रह ०.१ अंश एवढ्या अल्प अंतरावर वर्ष १६२३ मध्ये आले होते.

‘गुरु आणि शनि हे ग्रह साधनेतील प्रगतीसाठी पूरक आहेत. गुरु अणि शनि या ग्रहांच्या युतीचे दर्शन घेतांना प्रार्थना केल्यास आध्यात्मिक लाभ होईल.’
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, रामनाथी, फोंडा, गोवा.