पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी ३१ डिसेंबरच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षित वावर, तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत आहे कि नाही, याची पडताळणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे. त्यासाठी १४ पथके नेमण्यात आली असून ती सर्वत्र लक्ष ठेवणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ सहस्र ८०० बिअर बार आणि परमिट रूमपैकी ६०० बिअर बारआणि परमिट रूम सध्या चालू आहेत. राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना आल्यानंतर बिअर बार आणि परमिट रूम रात्री कितीपर्यंत चालू रहाणार, हे स्पष्ट होईल. ‘नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणार्या पार्ट्यांविषयी सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर पडताळणी करण्यात येईल’, असेही झगडे म्हणाले.