खासगी अधिकोषांना शासकीय अधिकोष व्यवहार हाताळण्यास अनुमती

खासगी अधिकोषांना मर्यादित प्रमाणात शासकीय अधिकोष व्यवहार  हाताळण्यास अनुमती देण्यासह अन्य निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

दळणवळण बंदीच्या काळात नियमभंग करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार – अनिल देशमुख, गृहमंत्री

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीच्या काळातील नियमभंगाचे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख केली.

गडचिरोली येथे विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू, तर ५० हून अधिक जणांना बाधा

दारूबंदी असलेल्या भागांत अशा प्रकारच्या घटना होणे हे कायद्याच्या पालनासाठी ज्यांनी जागरूक रहाणे प्रशासनाला जमत नसल्याचेच द्योतक आहे !

औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे करण्यासाठी मनसेकडून २६ जानेवारीपर्यंत समयमर्यादा 

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी नामांतराचा अध्यादेश २६ जानेवारीपर्यंत काढण्याची समयमर्यादा (अल्टिमेटम) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

‘तांडव’च्या विरोधात कारवाई केली जाईल ! – अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र

देवतांचे विडंबन असलेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजविषयी तक्रार आली असून करवाई होईल; पण ‘ओटीटी’वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी कायदा आणावा, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे एस्.टी. बसवर ‘संभाजीनगर’ असा फलक लावल्याच्या कारणावरून एम्.आय.एम्.कडून दगडफेक !

औरंगाबादवर एम्.आय.एम्.च्या धर्मांधांचे प्रेम आणि संभाजीनगर नामांतराला किती टोकाचा विरोध आहे, हे एस्.टी. बसवर केलेल्या दगडफेकीवरून दिसून येते.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या ‘तांडव’ वेब सिरीजवर बंदी घालून दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने २० जानेवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर आणि कागल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निमखेडी (जिल्हा जळगाव) येथे अनधिकृतपणे बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थांची पोलिसांवर दगडफेक !

१९ जानेवारी या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात अनधिकृतपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थ आणि पोलीस यांच्यात वाद झाला. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली.

प्रत्येक वेळी हिंदु देवतांचा अवमानच का ? – ओंकार शुक्ल, सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष, भाजप

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी आणून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने मिरज प्रांत कार्यालयात देण्यात आले.