‘टिमवी’ सांगली केंद्राच्या वतीने ३१ जुलैला आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा !

टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या सांगली केंद्राच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ३१ जुलै या दिवशी आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

महाबळेश्वर (सातारा) येथील ‘ब्लूमिंग डेल हायस्कूल’च्या वरच्या बाजूचा डोंगर खचला !

त्यामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून विद्यार्थ्यांचे दुसरीकडे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

दौंड येथील ४ अवैध शाळांना १४ लाखांचा दंड !

तालुक्यातील शासनाच्या अनुमतीविना चालू असलेल्या ३ अनधिकृत शाळा आणि परस्पर ठिकाण पालटणारी एक शाळा अशा एकूण ४ शाळांना १४ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दंड केलेल्या शाळा दौंड पंचायत समिती प्रशासनाने बंद केल्या आहेत.

निवडणूक आयोग शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शक्यता ! – डॉ. अनंत कळसे, माजी प्रधान सचिव

‘शिवसेना कुणाची ?’ हा निर्णय देण्याआधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह ठाकरे किंवा शिंदे अशा कोणत्याही एका गटाला न देता कायमस्वरूपी गोठवू शकते.

अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदी यांची २५३ कोटीची मालमत्ता कह्यात घेतली !

भारत सरकारने नीरव मोदी याला फरार घोषित केले आहे. नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

आमचे हिंदुत्व कोणत्याही धर्माचे लांगूलचालन करणारे नाही ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमचे हिंदुत्व सर्वांना समान न्याय देणारे आहे. आमचे सरकार हे हिंदुत्ववादी आणि मराठी माणसासाठी लढणारे आहे.

(म्हणे) ‘शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याएवढा अन्याय अन्य कुणी केला नाही !’ – शरद पवार

केवळ ब्राह्मण होते; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्य्र होय !

वागदे येथे ग्राहकाचे चुकीचे वीजदेयक भरण्याचा अधिकारी आणि ‘वायरमन’ यांना आदेश

अशा प्रकारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनच चुकीच्या कामांची भरपाई करून घेतल्यास प्रशासकीय कामे व्यवस्थित आणि गुणवत्ताधारक होतील !

सोनिया गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसकडून ईडीच्या कार्यालयांवर मोर्चा !

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मागील काही दिवसांपासून कारवाई चालू केली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने २१ जुलै या दिवशी मुंबई आणि नागपूर येथील संचालनालयाच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला.

बँकेने अयोग्य वर्तन केल्यास ग्राहकांना रिझर्व्ह बँकेला संपर्क साधण्याचा अधिकार !

तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल, त्या बँकेच्या कर्मचार्‍यांच्या तक्रारीसाठी तुम्ही बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकता. बँकेच्या ‘टोल फ्री’ क्रमांकावरही समस्या सांगू शकता. काही बँकांकडून ऑनलाईन तक्रार प्रविष्ट करण्याची सुविधाही दिलेली असते.