पुणे येथे ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस हवालदाराला अटक !

पोलीस विभागातील भ्रष्टाचारच संपत नाही, हे दुर्दैवी आणि संतापजनक ! लाचखोर पोलिसांना अन्यांच्या तुलनेत अधिक कठोर शिक्षा द्यायला हवी !

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणार्‍या तरुणास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !

अशा प्रकरणांचा निकाल लवकर लावल्यास महिलांवरील अत्याचार अल्प होण्यास साहाय्य होईल !

‘सुराज्याचा पहिला वाढदिवस आपण कधी साजरा करणार ?’

‘सुराज्याचा पहिला वाढदिवस आपण कधी साजरा करणार ?’, असा प्रश्न येथील मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसगाडीच्या फलकावरील लिखाणात विचारण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी मंत्रालयात बैठक घेणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा

संभाजीनगर येथे ‘ब्युटी पार्लर’ चालक महिलेची अपर्कीती केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा नोंद !

संभाजीनगर – वाळूज औद्योगिक परिसरात रहाणार्‍या आणि ‘ब्युटी पार्लर’ चालवणार्‍या एका महिलेचे इंस्टाग्रामवर खाते आहे. या महिलेच्या नावाने खोटे खाते काढत त्यावर अश्लील छायाचित्रे पोस्ट करून आणि महिलेचा भ्रमणभाष क्रमांक देऊन महिलेची अपर्कीती आणि विनयभंग केल्याप्रकरणी अनिता सावरे या महिलेवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी अपर्कीती झालेल्या महिलेने सायबर पोलिसांकडे सावरे … Read more

पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिना’निमित्त प्रदर्शन !

देशभरात १४ ऑगस्ट या दिवशी ‘फाळणी दु:खद स्मृतीदिन’ (विभाजन विभिषिका स्मृतीदिन) पाळण्यात येत आहे.

लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत दुचाकींची चोरी करणार्‍या २ आरोपींना अटक !

चोरीचे वाढते प्रमाण चोरट्यांना पोलिसांचे भय नसल्याचे दर्शवते. हे देशासाठी घातक आहे !

नेमणूक झालेल्या शाळेत रुजू न झाल्यास शिक्षकांना वेतन मिळणार नाही ! – प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

आवडीनिवडी बाजूला ठेवून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक हवेत. या उदाहरणातून शिक्षकांना स्वतःच्या कर्तव्याचे दायित्व वाटावे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित होते !

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद

गेल्या ३ दिवसांपासून पाऊस अल्प झाल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे १३ ऑगस्टला रात्री बंद झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४० फूट १० इंच इतकी नोंदवली गेली. आलमट्टी धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी अल्प होईल.

खातेवाटप घोषित, मुख्यमंत्र्यांकडे १४, तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खात्यांचे दायित्व !

महाराष्ट्रातील राज्यशासनाचे खातेवाटप १४ ऑगस्ट या दिवशी घोषित करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ८ खात्यांचे दायित्व असणार आहे.